जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । सणासुदीच्या काळात सोने-चांदीची मागणी वाढल्याने सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅमसाठी ५० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर ४८ हजाराच्या जवळपास होते. त्यात वाढ होऊन ते दर ५० हजार ४७० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दरही ६८ हजार ७२० रुपयांवर पोहोचले आहेत. सतत वाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या दरात सोमवारी देखील वाढ झाली. सोन्याचे दर १०० रुपयांनी तर चांदीचे दर १९० रुपयांनी वाढले.
जळगाव सराफ बाजारामध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोने प्रति १० ग्रॅमसाठी १०० रुपयांनी तर चांदी १९० रुपयांनी महागली. सणासुदीत सोने-चांदीची मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सतत वाढ होतांना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ४८ हजार ७५० रुपयांवर असलेले सोने आता ५० हजार ४७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यानुसार सोन्याच्या दरात १ हजार ७२० रुपयांनी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
आज (दि.१५) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,४७० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर किलोमागे ६८,७२० रुपये इतका आहे. सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
मागील आठवड्यात असे होते सोन्याचे दर?
सोमवार दि.८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर ४९,१००, मंगळवार दि.९ नोव्हेंबर रोजी ४९,१४०, बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी ४९,४२०, त्यानंतर गुरुवार दि.१० नोव्हेंबर रोजी ५०,००० तर शुक्रवार दि.११ नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर ५०,३७० रुपयांवर होते.