पोलिसांनी जप्त केला तब्बल दोन लाखांचा गांजा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा शेतीवर कारवाई करीत दोन लाख आठ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करीत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार, १२ रोजी दुपारी चिलारे गावाजवळील टिटवापाणी पाडा शिवारात ही कारवाई करण्यात आली.

चिलारे गावाजवळील टिटवापाणी पाडाशिवारात वन शेतात एक इसमाने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधीत गांज्या अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाव घेत छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी संशयीत हिरालाल व्यंकट पावरा (५२, रा. चिलारे टिटवापाणी पाडा) याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान ७४ हजार रुपये किंमतीचा ३७ किलो वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे व शेतात सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेला एक लाख ३४ हजार रुपये किंमतीचा २६ किलो ८०० ग्रॅम वजनाचा ओला गांजा असा एकूण २ लाख अठ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, हवालदार संजय सूर्यवंशी, नाईक संदीप ठाकरे, परशुराम अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पवार, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, संजय भोई, योगेश पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे, सईद रज्जाक शेख, रोहिदास पावरा यांच्या पथकाने शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक सुरेश यांनी ही कारवाई केली.