---Advertisement---
राष्ट्रीय

VIDEO : नेपाळमध्ये 72 प्रवाशी असलेलं विमान कोसळले ; आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२३ । नेपाळमध्ये आज रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. नेपाळमधील पोखरा येथे एक प्रवासी विमान कोसळले. विमान सेती नदीत कोसळलं आणि विमानाने प्रचंड पेट घेतला.  या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हुन अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलं आहे. या विमानात एकूण 72 प्रवासी होते. या विमानात 5 भारतीय नागरिकांसह 14 परदेशी प्रवासी होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत.

nepal plain crash jpg webp webp

मिळालेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने काठमांडूहून पोखरा येथे उड्डाण केले होते. या 72 सीटर विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, म्हणजे एकूण 72 लोक होते. विमान पोखराजवळ पोहोचले होते की लँडिंगच्या अवघ्या 10 सेकंद आधी ते कोसळले. नेपाळी मीडियानुसार, पोखराचे जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला.

---Advertisement---

अपघाताची माहिती मिळताच नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळावरून धुराचे ढग उठताना दिसत होते. बचाव पथकाने आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढले आहेत.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली होती. पंतप्रधान प्रचंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत सरकारचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---