जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । अमळनेर शहरात ऑनलाइन कुबेर मटका जुगार चालवून व्याजाने नागरिकांना पैसे देणाऱ्या महेंद्र महाजनसह इतर १८ जणांवर, अवैध सावकारी कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली. असून न्यायालयात हजार केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शहरातील पवन चौकातील बोरसे गल्लीत ११ रोजी सायंकाळी हरचंद भिला पाटील यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी पत्र्याच्या खोलीत एक लॅपटॉप, चार मोबाईल, २० डायऱ्या व ऑनलाइन जुगाराच्या साहित्यासह जयंत गणेश पाटील (रा.श्रीकृष्ण मंदिर) व फिरोजखान नसीमखान पठाण (रा.अंदरपुरा, सराफ बाजार) हे आढळले. त्यांनी हा जुगार महेंद्र महाजन चालवत असल्याचे सांगितले. कारवाईत ३ लाख ७ हजार ६०० रुपये रोख तसेच २५ धनादेश, त्यातील १४ कोरे व इतर रकमा लिहिलेले, विविध गावांच्या जमिनींचे लाखो रुपयांचे उतारे, बखळ प्लॉटचे उतारे, सौदा पावत्या, नोटा मोजण्याचे मशीन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. अटकेतील दोन्ही संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा :
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?
- भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध