---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

विजयाचा जल्लोष न करता नवनिर्वाचित नगरसेवकाने बाळासाठी घेतली धाव‎

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । मनात बाळगलेलं स्वप्न जेव्हा प्रत्येक्षात अमलात येतं, तेव्हा आनंदचा सूर वेगळाच असतो. ‘त्या’ विजयाच्या आनंदात आपण एवढे भारावून गेले असतो. की, सतत त्रास देणाऱ्या गोष्टीही विसरतो. मात्र, बोदवड तालुक्यात एक विजय अनोखा ठरलाय. नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेले असतानाही जल्लोष बाजूला ठेवत नवनिर्वाचित नगरसेवक जफर शेख यांनी एका लहान बाळाची आरोग्यदूत बनून मदत केली आहे.

bhavnik 1

नगरपंचायत सार्वत्रिक‎ निवडणूक २०२१ चा निकाल‎ नुकताच जाहीर झाला. त्यात‎ विजयी झालेले अनेक उमेदवार‎ शहरात जल्लोष साजरा करत होते.‎ त्यातच प्रभाग क्रमांक १४ चे जफर‎ शेख यांचाही समावेश हाेता. मात्र,‎ त्यांना त्याचवेळी एका सहकाऱ्याचा‎ फोन आला व तालुक्यातील‎ लोणवाडी येथील एका लहान‎ बाळाची तब्येत खालावल्याचे‎ सांगितले. जफर शेख यांनी‎ विजयाचा जल्लोष सोडून थेट‎ रुग्णालयात जाऊन बाळाच्या‎ प्रकृतीची चाैकशी केली. एवढेच‎ नव्हे तर प्रत्यक्ष मदत केल्यामुळे‎ ‎संबंधित कुटुंबास दिलासा मिळाला.‎

---Advertisement---

लहान बाळाची तब्येत‎ खालावल्याने नगरसेवक जफर‎ शेख व त्यांचे सहकारी डॉ.कलाम ‎फाउंडेशनचे नईम खान, समीर‎ पिंजारी, मुंताझिर अहमद यांनी ‘त्या’ बाळाला शहरातील खासगी‎ रुग्णालयात भरती केले. परंतु तब्येत ‎अधिक खालावल्याने डॉक्टरांनी बाळाला जळगाव येथील‎ रुग्णालयात हलवण्याचा सल्ला‎ दिला. त्यावेळी नगरसेवक जफर‎ शेख व डॉ.कलाम फाउंडेशनचे‎ नईम खान बागवान यांनी बाळाला‎ रुग्णवाहिका करून जळगाव येथील ‎दवाखान्यात घेऊन गेले. समीर‎ पिंजारी व मुतजिर अहेमद यांनी‎ त्यांना मदत केली.‎

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---