---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

अन् राष्ट्रवादी काँग्रेसने नाथाभाऊंना दिलेला शब्द पाळला .. भाऊ ‘पुन्हा’ आमदार होणार

khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीच्या राणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र त्या पूर्वीच एकनाथ खडसे पुन्हा आमदार होणार हे नक्की झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकनाथराव खडसे यांना दिलेला शब्द पाळला असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसेंना संधी मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. नाथाभाऊंच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला आम्ही विधान परिषदेत नेऊ असे वचन दिले होते. राष्ट्रवादीने आपला शब्द पाळला देखील आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादी खडसेंचे नाव देखील पाठविले परंतु गेल्या दीड वर्षापासून ती यादी प्रलंबित आहे. त्यामुळे पुढे चालून आलेल्या संधीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला शब्द पळाला आणि नाथाभाऊ पुन्हा आमदार झाले.

khadse

२०१४ साली भारतीय जनता पक्षाची सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात आली तेव्हा नाथाभाऊंचा त्यात मोठा वाटा होता. एकनाथराव खडसे हे तेव्हा तब्बल १२ खात्याचे मंत्री होते. मात्र दिवस बदलले आणि खडसे भाजपमध्ये एकाकी पडले. खडसेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत खडसेंचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत खडसेंऐवजी गोपीचंद पाडळकर यांना संधी भाजपने खडसेंना डच्चू दिला. आपले कुठे पुनर्वसन होईल, भोसरीचा अहवाल जाहीर होईल आणि आपण निर्दोष असल्याचे जगासमोर येईल असे खडसेंना वारंवार वाटत होते मात्र मनाप्रमाणे काही घडलेच नाही. उलटपक्षी खडसेंनाच भाजपात त्रास होऊ लागला. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

---Advertisement---

एकनाथराव खडसेंप्रमाणे मोठा नेता आपल्याकडे येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे वेलकम केले. खडसेंना मंत्रीमंडळात पाठविण्यासाठी त्यांनी विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य असणे आवश्यक होते. खडसेंना राष्ट्रवादीने दिलेल्या शब्दासाठी विधान परिषदेच्या निमित्ताने त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आणि आता एकनाथ खडसे पुन्हा आमदार होणार आहेत.

हे देखील वाचा : भाजपने मला अडगळीत टाकले आणि पवारांनी मला बाहेर काढले : खडसे

महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि राजकीय उलथापालथ जोरात सुरु आहे. राज्यसभेच्या रणधुमाळीतच विधान परिषद निवडणूक देखील येऊन ठेपली असून राज्यसभा निवडणूक १० जून रोजी पार पडल्यानंतर २० जून रोजी विधानसभा निवडणूक देखील पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ जून होती. आणि शेवटच्या दिवशीच नाथाभाऊंना त्यामुळे अर्ज भरायला आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.

विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी बैठक झाली. या बैठकीत एकनाथराव खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.मात्र राजकारणात काहीही होऊ शकत हा इतिहास आहे. यामुळे आता नाथाभाऊ आमदार होणार कि राष्ट्रवादी काँग्रेस आपला शब्द नाही पाळणार ? अशी चर्चा वर्तुळात होती. मात्र त्यांनी राष्टवादीने शब्द पळाला आणि आता खडसे आमदार होणार हे नक्की झाले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---