यावल नगरपरिषदेचे नाव मोठे दर्शन खोटे, शहरातील विकास कामे ठप्प
जळगाव लाईव्ह न्यूज । आमीर पटेल । यावल शहर स्वच्छ अभियान मध्ये राष्ट्रपती पुरस्कारीत असून, नाव मोठे दर्शन खोटे असल्याची परिस्थिती आहे. येथील विविध भागातील विकास कामे ठप्प असून, ते लवकरात लवकरत करण्यात यावे,अशी मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष रज्जाक पटेल यांनी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर असे की, यावल शहरातील विस्तारित भागात प्रभाग क्र.३ रजानगर हा आजी माजी नगराध्यक्ष यांचा वार्ड असून,येथील नागरिकांना नगरपालिकेत जावे लागत आहे हि, बाब अत्यंत नित्यांची आहे तसेच भारतामध्ये क्र.४ स्थानी पटकवलेल्या यावल शहर स्वच्छ अभियान मध्ये राष्ट्रपती पुरस्कारीत असून नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती यावल शहराची आहे.वार्ड क्र.३ चे नगराध्यक्ष यांचा वार्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यात डुकरांचा हाऊदोस वाडलेला आहे तसेच घराबोहती गटारी नसल्यामुळे साचलेल्या सांडपाण्याचा डोहामध्ये मलेरियासारखे आजाराचे डास उपत्ती वाढली आहे.यामुळे वाड्यातील संपुर्ण नागरिक त्रासलेली आहे. यांचा बंदोबस्त न झाल्यास वार्डातील नागरिक उपोषणात बसण्याचा तयारित आहे.तसेच विस्तारितवर नमूद केलेले कामे न झाल्यास व वाड्यातील रोगराई पसरल्यास सर्वस्वी जवाबदारी नगरपरिषदेची राहिल.तसेच नगरपरिषदने नळ कनेक्शनसाठी आगाऊ पैसे घेवूनही नळ कनेक्शन दिले तरी पाण्याची सोय उपलब्ध झाली नाही त्यामुळे याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष रज्जाक शकूर पटेल यांनी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी यांना निवेदनाव्दारे केली आहे.