⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

महापालिकेची वाटचाल प्रशासक राजच्या दिशेने : निवडणुकांचा नाही ठाव ठिकाणा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या 17 सप्टेंबर रोजी संपत आहे. अशावेळी निवडणूक कधी होईल याचा कोणताही अद्याप पर्यंत कोणताही ठाव ठिकाणा नसल्यामुळे जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासक लागण्याची दाट शक्यता आहे

एक ऑगस्ट 2018 ला महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. ३ ऑगस्टला निकाल जाहीर झाला होता. 17 सप्टेंबरला पहिली महानगरपालिकेची महासभा झाली होती. या सभेपासून पाच वर्षाचा कार्यकाळ होत असतो. त्यामुळे १७ सप्टेंबरला विद्यमान नगरसेवकांचा कालावधी पूर्ण होणार आहे.

नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने नवीन निवडणुकांची नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र यंदा नवीन प्रभाग रचनेची कोणतीही सूचना वजा आदेश आल्या नसल्याने प्रशासक राज लागेल असे म्हटले जात आहे.

महापालिका निवडणूक पुढे ढकलल्यास प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक, मुंबई, पुणे, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेची मुदत संपली आहे. त्यांच्याही निवडणुका न झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. जळगाव महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यास सतरा सप्टेंबर पासून महानगरपालिकेत आयुक्तांची प्रशासन राजवट लागू होईल असे म्हटले जात आहे. निवडणूक होईपर्यंत आयुक्त कारभार पाहतील. अशी शक्यता आहे