---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

रिफॉर्मेशन कपचा पहिला विजेता ठरला मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३  जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित मुस्लीम समुदायाच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा रिफॉर्मेशन कप जिंकण्याचा मान मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघाने पटकावला. युथ ऑफ जळगावतर्फे जी.एस. ग्राउंडवर आयोजित क्रिकेट स्पर्धेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद लाभला.

criket jpg webp webp

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मुस्लीम समुदायाच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युथ ऑफ जळगावतर्फे करण्यात आले होते. रिफॉर्मेशन कपच्या स्पर्धा दि.४ आणि ५ फेब्रुवारी रोजी जी.एस. ग्राउंड मैदानावर पार पडल्या. तरुणांना एकमेकांशी जोडणे, फिटनेस, खेळांचे महत्व पटवून देणे, संयम आणि उत्साह जागरूक करणे, संघ भावना वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेचा हेतू आयोजक, मान्यवर, खेळाडू, प्रेक्षकांनी सार्थ ठरवला.

---Advertisement---

स्पर्धेत जळगावातील ८ संघ सहभागी झाले होते. संघाचे प्रायोजकत्व वसीम बापू , नदीम मलिक, यासीन मुल्तानी, लालू पटेल, मिर्झा हारिस व शोएब सत्तार, नेहाल शकील रंगरेज, शाहबोद्दीन भाई यांनी स्वीकारले होते.

दोन दिवसीय स्पर्धेत अंतिम सामना रंगरेज शॉपी विरुद्ध मिर्झा ब्रदर्स यादगार संघात रंगला असता ७८ धावांचे लक्ष गाठताना रंगरेज शॉपी संघाचा १० धावांनी पराभव झाला. अखेरच्या तीन षटकात कोण विजयी ठरणार याची मोठी उत्सुकता लागून होती. शेवटच्या षटकापर्यंत चुरस कायम होती. मॅन ऑफ द सीरिजचा बहुमान रफिक शेख, मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ, बेस्ट बॅट्समॅन किताब एयू सिकलगर संघाचा खेळाडू मुजाहिद जहागीरदार याने तर बेस्ट बॉलरचा बहुमान मिर्झा ब्रदर्सच्या शाहरुख लाली या गोलंदाजाने पटकावला.

स्पर्धेच्या अंतीम दिवशी मान्यवर आ.राजू मामा भोळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, साजीद भाई इन. (वाजीद फाऊंडेशन), युसुफभाई मकरा, मजीद मेमन, गनी मेनन, फारूक भाई बिबा, डॉ.मोइज देशपांडे, डॉ.मजीद खान, डॉ. मिनाज पटेल, ऍड.सागर चित्रे, मुफ्ती अतीक उर रेहमान, मुफ्ती हारून नदवी, अ.करीम सालार, अ.अजीज सलार, अ.एजाज मलीक, अ.वाहब मलीक, आरिफ देशमुख (प्रिंट हब), कादर टिक्की, इब्राहिम मुसा पटेल, हारून पटेल, निसार खाटीक सर, फारूक शेख, इकबाल मिर्झा, रिझवान खाटीक, जळगाव लाईव्हचे संपादक चेतन वाणी यांनी उपस्थिती देत बक्षीस वितरणाला हजेरी लावली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीतील ऑर्गनाइजर रेहान खाटिक, शारीक शेख, आमिर शेख, आसिफ मिर्झा, सद्दाम पटेल, जकी अहमद, आसिफ पटेल, अज़हर खान, शोएब बागवान, अलफैज़ पटेल, आमिर पटेल, नदीम खान, शोएब खान, शाहरुख लाली, अतीक शेख, साद शेख, तौकीर खान, नेहाल शेख, तनवीर खान, आकीब खान यांनी परिश्रम घेतले.

समालोचक म्हणून असिफ मिर्झा, अलफैज पटेल, रेहान करिमी, रौशन भाई यांनी आपले कर्तव्य पार पाडले व सूत्र संचालन आसिफ मिर्झा यांनी केले तर आभार रेहान खाटीक यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---