बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

जळगावकरांना मिळणार दिलासा! पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अदांज..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । केरळात ८ जून रोजी दाखल झालेला मान्सून तीन दिवसात महाराष्ट्रात धडकला आहे. त्यापूर्वी राज्यातील एकही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत असून आता पाऊस लवकर येऊ दे म्हणत पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. अशातच आज जळगावात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मान्सून लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत असून अशातच राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास २३ जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान, आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

जळगावात मागील काही दिवतसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा 41 अंशावर आहे. पहाटेच्या वेळी आकाश प्रामुख्याने स्वच्छ दिसत असून दुपार आणि संध्याकाळच्या दिशेने हळूहळू अंशतः ढगाळ होत असल्याचे चित्र सध्या जळगावात दिसत आहे. मान्सून पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मान्सून कधी दाखल होईल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत

राज्यात मान्सून दाखल होऊन एक आठवला होण्यात आला. मात्र अद्यापही मान्सूनने राज्य व्यापलं नाहीय. देशावर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवासाला अडथळा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.मात्र मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी १८ ते २१ जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून गुरुवारी जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार १६ ते २२ जूनच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्य दिसत आहे. मॉडेलनुसार २३ जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल तर नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल.