जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । लोकशाहीतील लोकसभा, न्यायपालिका, नोकरशाही यांच्यावर अंकुश म्हणजे माध्यम असून पत्रकार हे पद फार मोठे पद आहेत. तरी वृत्तपत्रपुढे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जे एक ध्येय होते. तेच ध्येय समोर ठेवून पत्रकारांनी समाज प्रबोधन जन जागृती करावी. तसेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि ज्येष्ठ पत्रकार व कवयित्री शांताताई शेळके यांनी त्यांच्या जीवनात केलेले चांगले कार्य बाबत उपस्थितांना अतिशय सोप्या व साध्या पद्धतीने मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माझ्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ काळात माझा जन्मभूमीत व्याख्यान करण्याची संधी ओरिजनल पत्रकार संघ सावदा यांच्यामुळे मिळाली हा माझ्या जीवनातील अस्मरणीय क्षण आहे असे भावनिक उदगार प्रा. नितीन मटकरी यांनी सावदा येथे पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
सावदा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार शांताताई शेळके यांची जन्मशताब्दी वर्ष आणि पत्रकार कैलास सिंग परदेशी यांचे स्मृतीप्रीत्यर्थ ओरिजिनल पत्रकार संघ सावदा यांनी प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालयात आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाची प्रमुख वैशाली दीदी यांनी भूषवले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक रावेर यावल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक व प्रमुख अतिथी म्हणून सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले, प्राध्यापक नितीन मटकरी हे होते. या मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून ज्येष्ठ कवयित्री व पत्रकार शांताताई शेळके आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. कार्यक्रमात प्रस्ताविक भाषण पत्रकार दीपक श्रावगे यांनी केले.
यानंतर ओरिजिनल पत्रकार संघ सावदाचे पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच कोरोना काळात वैद्यकीय व समाजसेवी लोकांनी जनतेस केलेली मदत व सहकार्य करणाऱ्या हाजी शब्बीर हुसैन अख्तर हुसैन बौहरी ऊर्फ बाबूशेठ,नगरसेवक फिरोज खान हबीबुल्ला खान, डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे चेअरमन हाजी हारुन शेख इक्बाल, सिटी हॉस्पिटलचे डॉ.अन्सार खान गुलाम गौस खान, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका सौ. सारिका चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार भानुदास भारंबे, पत्रकार दीपक श्रावगे, यांचे शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, एपीआय देविदास इंगोले वैशाली दीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यानंतर उपविभागीय अधिकारी एपीआय देविदास इंगोले व वैशाली दीदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दरम्यान मुक्ताईनगर मतदा संघाचे आ. चंद्रकांत पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले असता सदर कार्यक्रमात त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुषार भाऊ बोरसे हे आल्याने त्यांच्याही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सलमान पूर्व सत्कार करण्यात आले.
यावेळी ओरिजिनल पत्रकार संघ सावदाचे अध्यक्ष युसूफ शाह, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सदस्य व दिलीप चांदेलकर, प्रदीप कलकर्णी, संतोष परदेशी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्ष राजेंद्र पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरज परदेशी, शरद भारंबे, दुर्गा केबलचे संचालक किशोर परदेशी, अजमल खासाब, गजू ठोसरे, सुनील चोपडे, राजेश चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख इरफान मिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सकळकळे सर व फरीद शेख यांनी केले. कार्यक्रमात कोरोना काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी देखील त्यांना स्वतः जवळून प्रत्येकी 500 रु सत्कार म्हणून दिले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओरिजनल पत्रकार संघटना सावदा व प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाचे सर्वांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी