जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । अमळनेर शहरात नुकतेच संत सखाराम महाराज यात्रोत्सव पार पडले. यावेळी अज्ञात चोरट्याने यात्रोत्सवात आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत चोरून नेल्याची घटना २०मे रोजी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
योगिता दिपक पवार (वय-३५) रा. तुकाराम नगर, जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० मे रोजी अमळनेर शहरात संत सखाराम महाराज यात्रोत्सव घेण्यात आला. या यात्रोत्सवात महिला देखील दाखल झाल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.