---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावली ; आता कोणत्या धरणात किती जलसाठा?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२४ । सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. यामुळे तीव्र उष्णता जाणवत असून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. यातच जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईने डोकं वर काढलं आहे.

jalgaon disctrict dam jpg webp

जिल्ह्यातील ८२ गावांमध्ये १०१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक टँकर चाळीसगाव तालुक्यात पुरविले जात असून जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत असून, टंचाईचे संकट गडद होत आहे. सोबतच जिल्ह्यातील बहुतांश धरणांची पातळी खालावली आहे. विशेषतः जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या २०.५७ टक्के इतकाच पाणी साठा आहे.

---Advertisement---

जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. पाऊस लांबल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कडक उन्हाळा जाणवत असल्याने भूगर्भातील पाणीपातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. काही गावांना गत वर्षभरापासूनटँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती जलसाठा?
धरणाचे नाव आणि शुक्रवारच्या जलसाठ्याची टक्केवारी
हतनूर – ३१.४५
गिरणा -२०.५७
वाघूर – ६२.१७
सुकी – ६३.९८
अभोरा -६५.४३
मंगरुळ- ४२.४४
मोर – ६५.११
अग्नावती -००
हिवरा -००
बहुळा – १०.६९
तोंडापूर- १३.६३
अंजनी- ०१.८६
गूळ – ४८.१२
भोकरबारी- ००
बोरी – ००
मन्याड -००

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---