⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा नवीन हद्दवाढ झालेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य

सावदा नवीन हद्दवाढ झालेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । सावदा येथील नागरिकांची पाणी व घर पट्टी कर जास्तीची आकारणी करण्यात आली आहे त्यामुळे यात सवलत मिळावी. अशी मागणी येथील नागरिकांनी पालिकेच्या कर निरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद आहे की, रावेर तालुक्यातील सावदा येथे गेल्या दोन वर्षांपासून शहराची हद्दवाढ झाल्याने संपूर्ण नवीन भाग पालिका हद्दीत समाविष्ट आहे. या भागात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट सुविधा नाही तर परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य आहे. तसेच पाणी व घर पट्टी जास्तीची आकारणी करून तश्या कर पावत्या येथील रहिवाश्याना देण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांच्या मनात पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र चीड निर्माण झालेली आहे. याबाबत २८ रोजी नगरसेवक फिरोज खान पठाण व अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू शेठ यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्रस्त नागरिकांनी आप करण्यात आलेले जास्तीचे पाणी व घरपट्टी असे जुलमी कर कमी होऊन मिळावे अशी मागणी सावदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी व मुख्य अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये पालिकेचे कर निरक्षक अनिल कुमार अहुजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अकबर खान, अमानुल्ला खान, शेख हुसनोद्दीन, शेख रफिउद्दीन, अश्फाक खान, इस्माइल खान, कादीर गुलाब खाटीक, शेख कमालुद्दीन हुसनोद्दीन यांच्यासह १२० रहिवाशांच्या सह्या आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह