येत्या ४८ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. दरम्यान, राज्यात येत्या ४८ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४८ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. यात मुंबई, कोकण, पुणे, रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज होईल.
याशिवाय मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून राज्यात २५ आणि २६ सप्टेंबरला विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून (२५ सप्टेंबर) भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
जळगाव जिल्ह्यामधील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. तसेच शेतातील खरिपाचे पिके पाण्याखाली गेले. जिल्ह्यात आज पावसाचा इशारा नसला तरी तुरळक पावसाचा इशारा आहे.
जळगांव जिल्हा
बोदवड-60
भडगाव-10
भुसावळ-2.4
चोपडा-3
मुक्ताईनगर-9