⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | Jalgaon Crime : खोटे नाव सांगून प्रेम, नंतर महाविद्यालयीन तरुणीसोबत घडलं भलतंच

Jalgaon Crime : खोटे नाव सांगून प्रेम, नंतर महाविद्यालयीन तरुणीसोबत घडलं भलतंच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस या प्रकाराच्या घटना वाढत चालल्या आहे. यात मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या घटनाही वाढतच चालल्या आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे.

जळगावात फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महाविद्यालयीन मुलीसोबत वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एका भागात राहणारी तरुणी शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये अल्पवयीन असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नाव सांगून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते दोघे कॅफेमध्ये सोबत जावू लागले त्या वेळी तरुणाने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले.

त्यानंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी तो तरुणीला कोल्हे हिल्स परिसरात मित्राच्या खोलीवर घेऊन गेला व तेथे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता तरुणीच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध केले. नंतर पुन्हा मेहरुण तलाव ट्रॅकवर शारीरिक संबंध केले. काही कारणावरून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले असता तू मला भेटली नाही, माझ्याशी संबंध ठेवले नाही तर आपले सोबतचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करून तुझ्या घरच्यांना सुध्दा दाखवेल अशी धमकी दिली. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहू लागली. नंतर त्याने धरणगाव रस्त्यावर जंगलात व त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा अत्याचार करणे सुरूच ठेवले.

नेहमीच्या बँकमेलिंगमुळे तरुणी आजारी पडली व हा त्रास असह्य झाल्याने या १८ वर्षीय तरुणीने शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.