⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धार्मिक स्थळांवर हल्ला करणारी विचारधारा समाजाच्या हिताची नाही – शरद पवार

धार्मिक स्थळांवर हल्ला करणारी विचारधारा समाजाच्या हिताची नाही – शरद पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । राज्यात सातत्याने दंगली घडत आहेत. धार्मिक दंगल समजा मर्यादित भागात झाली तर तो चिंतेचा विषय नाही. मात्र सध्या राज्यात असे कित्येक प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जाता आहेत. काल कोणीतर गर्दीत औरंगजेबाचा फोटो दाखवला. मात्र आता या गोष्टीसाठी इतर ठिकणी दंगल करायचं कारण काय? यासाठी पुण्यात आंदोलन करायची काय गरज आहे, असा सवाल राष्ट्रवादी कॅांग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिशदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी पवार म्हणाले कि, ‘ओडीशामध्ये आणि काही राज्यामध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. खिश्चन समाज तसा शांतताप्रिय आहे. कुणाची काही चूक असेल तर पोलीस अॅक्शन घ्यावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर कशाला हल्ला करावा? हे जे घडतंय, हे सहजासहजी घडत नाही. हे एकटया दुकट्याचं काम नाही. यामागे काही विचारधारा आहेत. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही

author avatar
टीम जळगाव लाईव्ह