जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । शहरातील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका होमगार्डला शिवाजीनगर लसीकरण केंद्रावर सापडलेले एक मंगळसूत्र त्याने प्रामाणिकपणे परत केल्याने त्याचे कौतुक होत आहे.
शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले होमगार्ड अरविंद सोनवणे यांची सोमवारी शिवाजीनगर परिसरातील डी.बी. जैन मनपा रुग्णालयात लसीकरण बंदोबस्त कामी ड्युटी होती. दुपारी त्यांना त्याठिकाणी खुर्चीखाली एक मंगळसूत्र मिळून आले.
त्यांनी लागलीच त्या ठिकाणी विचारपूस केली असता एका महिलेने मंगळसूत्र हरवले असल्याचे सांगितले. सर्व खात्री केल्यानंतर त्या महिलेला मंगळसूत्र परत करण्यात आले. अरविंद सोनवणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे पोलिस प्रशासन व होमगार्ड बांधवांकडून कौतुक केले जात आहे.