जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी राज्यातील अकोला व भुसावळात सर्वाधिक ४२.९ तापमानाची नोंद झाली. जळगाव शहरासह जिल्ह्याचे तापमान बुधवारी (ता. १६) दुपारी चारला ४१ अंशावर पोचले. नंतर मात्र ४० अंशावर तापमान स्थिर झाले. जिल्ह्यात तापमानाचा पारा १६ ते २१ मार्च दरम्यान ४४ अंशापर्यंत जाईल, असा इशारा हवामान विभागाने अगोदरच दिला होता. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत लांबलेली थंडी आणि मध्येच येणाऱ्या अवकाळी पावसामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत जळगाव जिल्ह्याचा पारा ४० अंशावर गेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा पारा चाळिशी पार गेला आहे. जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढून ४२ अंशांवर गेले हाेते. तर राज्यातील सर्वाधिक अकोलासह भुसावळात ४२.९ तापमानाची नोंद
झाली.
सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा चटका वाढला हाेता. १०.३० वाजता पारा ३३ अंशांवर गेला हाेता. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा चटका वाढला हाेता. १०.३० वाजता पारा ३३ अंशांवर गेला हाेता. तापमान वाढल्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. अशातही अनेक जण तापमानापासून बचावात्मक साधनांचा वापर करून आपली नियमित कामे करताना दिसत आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते.
दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर हळूहळू कमी होईल, असे नाशिकचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.