⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

घरातील सोन्यासह रोकड घेऊन पळालेल्या युवतीसह अपहरणकर्त्याच्या पोलिसांनी आवळल्या राजकोटमधून मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 5 जानेवारी 2023 : घरातून ७५ हजार रुपये रोख आणि दीड तोळे सोने घेऊन पसार झालेली युवती आणि तिच्या अपहरणकर्त्याला पहूर (ता. जामनेर) पोलिसांच्या पथकाने बुधवारी राजकोटमधून ताब्यात घेतले.

याबाबत असे की जामनेर तालुक्यातील एका गावातील एकवीस वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची घटना २९ डिसेंबर २०२३ रोजी समोर आली होती. या प्रकरणात पहूर पोलिसात शेख दाऊद शेख कालू (३२, रा. लेलेनगर, पहूर) याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

चौकशीदरम्यान रसददखाँन सफदर खाँन (३०, रा. खाँजानगर, पहूर) याला अटक झाली होती. या दोघांच्या संगनमताने मुलीने स्वतः घरात चोरी केली. त्यामुळे तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे दोन पथके त्यांचा शोध घेत होते. अखेर राजकोट येथून या दोघांना ताब्यात घेत गुरुवारी जळगावला आणण्यात आले. त्यांना आज जामनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पत्नीने दिली दाऊदविरुद्ध फिर्याद
दरम्यान, शेख दाऊद हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. असे असताना त्याने संबंधित युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसविले. त्याची पत्नी सुमैय्या शेख दाऊद हिने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा पहूर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.