जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला लिफ्ट देऊन एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर चाकूचा धाक दाखवून रोकड, मोबाइल व बॅगची लूटमार करणाऱ्या चार दरोडेखोरांना गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
सीआरपीएफमध्ये कार्यरत जवान श्रीकांत शांताराम माळी (रा. सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी निघाल्यानंतर १८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले. एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे चालकाने तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालकासह त्याच्या सोबतच्या संशयितांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये, तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयित पारोळ्याकडे पसार झाले.
या संदर्भात जवान श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने मनोज रमेश पगारे, आकाश राजेंद्र जगताप, प्रशांत अशोक वाघ व विशाल राजेश मोरे (सर्व रा. मालेगाव) यांना गुरुवारी मालेगावहून येथून अटक केली. चौघांना एरंडोल पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
- Amalner : दूध विक्रीकरून वडिलांना हातभार लावणाऱ्या ‛भाग्यश्री’चा अज्ञात वाहनाने घेतला जीव
- Bhusawal : गावठी कट्ट्याने गोळी झाडून प्रौढाने संपविले जीवन
- विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
- जामनेरात वऱ्हाडीच्या वाहनाला भीषण अपघात ; नवरदेवाचा काका जागीच ठार, नऊ जण जखमी
- जामनेर तालुक्यामध्ये तीन अपघातात तीन जण ठार ; ११ जखमी