---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जिल्हा पुन्हा हदरला : 23 वर्षीय युवकाचा दुचाकीवरून ढकलून केला खुन !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । भुसावळ तालुक्यातीत एक खुन झाला आहे. फेकरी गावातील 23 वर्षीय युवकाचा दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्यावर पडताच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फेकरी उड्डाण पुलाजवळील साकरी सर्विस रोडवर शनिवारी पहाटे ही घटना घडली आहे.

khun 1 jpg webp webp

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. मंगल शांताराम शेळके (23, फेकरी, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

---Advertisement---

भुसावळ तालुका पोलिसात आकाश शांताराम शेळके (25, रा.फेकरी, वाल्मिक नगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके (23) याच्यासोबत पूर्वी झालेलाा वाद उकरुन संशयित राहुल तुकाराम पाडळे (28, मु.पो. फेकरी, ता.भुसावळ) याने 16 जूनच्या रात्री 12 ते शनिवार, 17 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली तसेच त्याच्याशी झटापट करुन त्याला मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.बी.2024) वर जबरदस्तीने बसवत जोराने ढकलून दिल्याने तो फेकरी उड्डाणपुलाखाली पडल्याने त्यास जबर दुखापत होवून मेंदूला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

खून प्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाडळे (28, फेकरी) यास अटक केली आहे. तपास पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---