बांधकाम झालेली जागा बखळ दाखवली अन्.., सावदा पोलिसांत ७ जणांविरुद्ध गुन्हा
Savda News-जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । फैजपुर येथील एका संस्थेतील कर्जदार व्यक्तीची बांधाकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवून खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांत ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर असे की, प्रशांत विलासराव कुलकर्णी (वय 45) धंदा सरकारी नोकरी (दुय्यम निबंधक श्रेणी-1, सावदा) रा. भुसावळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार फैजपुर वि.का. सह सोसायटी लि. ठेव संकलन कर्जवाटप विभाग लि फैजपुर ता यावल तर्फे शासनमान्य विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील, चेअरमन सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या आमोदे ता यावल तर्फे अनिल विनायक पाटील रा. आमोदे ता. यावल, जितेंद्र प्रकाश पवार रा. सावदा ता. रावेर (मयत), कविता जितेंद्र पवार रा. सावदा ता. रावेर (वारस), युगंधर जितेंद्र पवार दोघे रा. सावदा ता. रावेर (वारस), अमिता हेमराज चौधरी रा. फैजपुर ता. यावल, नितीन चंद्रकांत पाटील दो. रा. फैजपुर ता यावल यांनी मौजे सावदा ता. रावेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि. 8 जुलै 2013, दि. 7 मार्च 2019 व दि. 17 जानेवारी 2022 रोजी सदर बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवला.
यातील फिर्यादीची फिर्याद की. वरील नमुद तारखेस वेळी व जागी यातील आरोपी क्र. 1 याने मौजे फैजपुर ता. यावल नगर पालीका हद्दीतील गट नं. 1444 मधील प्लॉट नं.06 व 11 ही मालमत्ता फैजपुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत फैजपुर या संस्थेचे कर्जदार नामे युवराज सुदाम तळेले, रा. फैजपुर ता. यावल यांचे कडेस सदर संस्थेचे कर्ज थकबाकी असल्याने संस्थे मार्फत लिलाव करुन प्राप्त केली. सदरची मालमत्ता हिचेवर बांधकाम झालेले असतांना देखील ती बखळ असल्याचे दर्शवून यातील आरोपी क्र.02 यांना लिलाव पद्धतीने विक्री करुन त्या व्यवहाराचा दुय्यम निबंधक कार्यालय सावदा येथे दि. 08 जुलै 2013 रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करुन दिली, तीच मालमत्ता यातील आरोपी क्र.02 याने बखळ असल्याचे दर्शवुन यातील आरोपी क्र.03 यास दि. 07 मार्च 2019 रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करुन दिली.
त्यानंतर आरोपी क्र.03 हा मयत झालेने त्याचे वारस यातील आरोपी क्र.04 व 05 यांनी तिच मालमत्ता ही बांधीव असतांनाचे माहीती असुन देखील बखळ असल्याचे दर्शवून यातील आरोपी क्र.06 व 07 यांना दि. 17 जानेवारी 2022 रोजी नोंदणी पद्धतीने कायम खरेदी करुन दिली, वरील प्रमाणे आरोपी क्र.01 ते 07 यांनी वरील मालमत्ता ही बांधीव असल्याचे माहीती असुन देखील ती बखळ दर्शवुन सदर मालमत्ता खरेदी विक्री करतांना शासनाचा महसुन बुडवुन नुकसान केलेले आहे, तसेच वरील आरोपीतांनी शासनाची दिशाभूल केली म्हणून फिर्यादीचे फिर्यादी वरून सावदा पोलीस स्टेशन गुरन- 226/2022, नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 प्रमाणेगुन्हा दाखल करणेत आला असुन पुढील तपास स.पो. नि .जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. फौज. उस्मान तडवी, पो.हे.कॉ. संजय चौधरी व उमेश पाटील हे करीत आहे.