⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | महाराष्ट्र | नियमांचे उल्लंघन बाबत पोलीस आयुक्त निर्णय घेतील ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नियमांचे उल्लंघन बाबत पोलीस आयुक्त निर्णय घेतील ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २ मे २०२२ । औरंगाबाद येथील मनसे च्या सभेत पोलिसांनी दिलेल्या अटी शर्थीचे उल्लंघन झाले आहे कि नाही ?, यापार्श्वभूमीवर भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा नसुन या सभेत केलेले भाषण पोलीस ऐकतील आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यावरून नियमांचे उल्लंघन संदर्भात पोलीस आयुक्त निर्णय घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद येथील सभेत मशिदीवरील भोंगे ४ मे नंतर उतरले नाहीत तर दुपटीने हनुमान चालीसा लावा असे मनसेच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले, मुळात भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा नसुन तो राज्य सरकारने घ्यायचा आहे. औरंगाबादच्या सभेत पोलिसांच्या अटीचे पालन झाले नसल्याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्त यासंदर्भात व्हिडीओ पाहतील त्याच्या अहवाल वरिष्ठांना पाठवून कायदेशीर सल्ला घेतील त्यानंतरच वरिष्ठ निर्णय घेतील. या सभेत केवळ आणि केवळ शरद पवार यांच्यावर आरोप करीत दोन समाजातील भावना कशा भडकतील द्वेष निर्माण होईल याचाच प्रयत्न केला गेला आहे. रविवारी झालेले भाषण पोलीस पाहतील आणि त्यात आक्षेपार्ह काय आह, नाही याबाबत निर्णय औरंगाबाद पोलीस आयुक्त घेतील. राज ठाकरे यांना दुसरे काही सांगायचे नसल्यानेच त्यांनी शरद पवार यांच्या नास्तिकतेचा मुद्दा उपस्थित केला, त्या ऐवजी पेट्रोल डीझेल भाववाढीचा, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलायला पाहिजे होते, केवळ समाजात तेढ निर्माण होईल हेच काम त्यांच्याकडे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.