⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

५ ते १८ ऑगस्टदरम्यान हाेणार सीईटीची परीक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. पीसीएम व पीसीबी ग्रुप या दोन्ही ग्रुपच्या परीक्षा ५ ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान होणार आहे. सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासाठी सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांच्यासाठी विलंब शुल्कासह २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली हाेती.