⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | बुलढाणा अपघातानंतर बसेस संदर्भात केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

बुलढाणा अपघातानंतर बसेस संदर्भात केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२३ । देशभरात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. त्यातच मागील काही दिवसापूर्वी बुलढाणा बस अपघातात २५ पेक्षा जास्त लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच आता सर्व खासगी बसेस संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार आहे.

बस-ट्रकचालकांना गाडी चालवताना चालकाला तंद्री किंवा डुलकी लागल्यास अलार्मद्वारे दक्ष राहण्याच्या सूचना देणारी यंत्रणा सर्व खासगी बसमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक दर्शवली आहे. केंद्रीय रस्ते सुरक्षा बैठकीत यंत्रणेचे प्रमाणीकरण करून बसगाड्यांसाठी ही यंत्रणा बंधनकारक करण्यावर सहमती घडली.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील रस्ते सुरक्षा सप्ताहाची बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पाडली. आधुनिक यंत्रणा वापरून रस्ते अपघात कमी करण्यासह उपलब्ध उपायांचा आढावा बैठकीत घेण्यात आला होता.

गाडी चालवताना थकवा आल्याने तसेच आळसामुळे डुलकी किंवा तंद्री लागल्यास चालकांना तातडीने जागे करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित यंत्रणा गाडीत बसविणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा विकसित केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होऊ शकते. ‘मोटार वाहन कायद्यात याबाबत सुधारणा करून तसा कायदा लागू केल्यास राज्यातील सर्व बसगाड्यांसाठी हे बंधनकारक करण्यात येईल’, असे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी बैठकीत सूचित केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.