जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । महामार्ग क्रमांक सहावरील एसएसबीटी बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज पुढे सावली होस्टेल जवळ एका चालत्या रेनॉल्ट डस्टर कारने अचानक पेट घेतल्यानंतर गाडी जळून खाक झाली. दरम्यान, या वाहनातून कोण, कुठे जात होते? कोणाच्या मालकीचे वाहन आहे?, याची माहिती मात्र लगेच समजू शकली नाही.
याबाबत असे की, बांभोरी इंजिनिअरिंग कॉलेज पुढे सावली होस्टेल जवळ एम एच ०२ – डी एन – ००७९ या क्रमांकाच्या रेनॉल्ट डस्टर कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे हे फायरमन रोहिदास चौधरी, हिरामण बावस्कर, पन्नालाल सोनवणे आदींनी घटनास्थळ गाठून आग विझविली. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान, यावेळी बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत होती. यावेळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती
दरम्यायान, हे वाहन कुणाच आहे, वाहनातून कोण, कुठे जात होते? कोणाच्या मालकीचे वाहन आहे ?, याची माहिती मात्र लगेच समजू शकली नाही.