Breaking : प्रवाशांनी भरलेली बोट यमुनेत बुडाली, 20 जण बुडाल्याची भीती
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. यमुना नदीत बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना समोर आलीय आहे. 20 हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांदा हद्दीमधील ठाणे असोठार येथील राम नगर कौहान घाटासमोर ही घटना घडलीय. बांदा आणि फतेहपूर पोलिसांच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. बोटीवर 30 हून अधिक लोक होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांदा जिल्ह्यातील यमुना नदीत बोटीच्या दुर्घटनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाला तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत शोकाकुल कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकारी, डीआयजी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाला तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.