आता हेच राहिले होते.. चक्क शेतातून चोरल्या ५०० किलो कैऱ्या

जून 9, 2022 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । शेतातून तब्बल ५०० किलो कैऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

crime 81 jpg webp

भडगाव येथील प्रविण रामनारायण बाहेती (वय ६५) यांच्या भडगाव शिवारातील शेतात असलेल्या कैऱ्यावर आरोपी रत्नाकर लक्षमीकांत निशानदार रा. बालाजी गल्ली भडगाव व सुहास सुधाकर निशानदार रा. सिनेमा गल्ली भडगाव यांनी अधिकार प्रवेश करून शेतातून १० हजार रुपये किमतीच्या कैऱ्या चोरून नेल्या व दमदाटी केली. या प्रकरणी भडगाव पोलिसांत बाहेती यांनी दि. ८ रोजी दुपारी २.३० वाजता पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार दोघांवर भादवी कलम ३७९, ४२७, ४४७, ५०४, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना नितीन रावते करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now