⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खून प्रकरणातील ‘त्या’ संशयिताला तब्बल १२ वर्षानंतर अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । पोटावर चाकूने हल्ला करून खून करणाऱ्या संशयिताला तब्बल १२ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मुक्तार जव्वार तडवी ( वय ४९, रा. पिंपळगांव हरेश्वर ह.मु. खडकदेवळा ता.पाचोरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

आरोपी मुक्तार जबबार तडवी याने मुनीर कुतब्बुद्दीन तडवी (रा.पिंपळगांव हरेश्वर ता.पाचोरा) याचे पोटावर चाकूने हल्ला करून ठार मारले होते. त्यामुळे त्याला २००६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. व त्याची मध्यवंती कारागृह नाशिक येथे रवानगी करण्यात आली होती. त्यास दि. २९/०६/२०१० रोजी १४ दिवस संचीत रजेवर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्यांने पुन्हा १४ दिवस संचीत रजेची वाढीव मंजूरी घेतली त्यास दि. २२/१०/२०१० रोजी कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. परंतु तो हजर झाला नाही. म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोस्टेला भाग ५ गुरनं ६३/२०१३ भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. तेव्हा पासून तो फरार होता. त्याला आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरोपी हा खडकदेवळा गांवात आला असल्याची गोपनीय माहीती मिळाली त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, स.फो. अशोक महाजन, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर पाटील, अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.