⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ठाणे महानगपालिकेत विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. इतका मिळेल पगार

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 14 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा – 54

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अटेंडंट / Attendant २४
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी पास ०२) शासकीय/निमशासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागात काम केल्याचा अनुभवास प्रधान्य. ०३) शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये अटेंडट म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभवास प्रधान्य. ०४) मरीठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

२) कनिष्ठ तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) / Junior Technician (Laboratory) १९
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र,जीवशास्त्र, वा सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी उत्तीर्ण. ०२) शासन मान्य संस्थेची पी.जी. डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) पदवीस प्राध्यान्य. शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये ज्युनियर टेक्निशियन म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभवास प्रधान्य.

३) कनिष्ठ तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) / Junior Technician (Radiology) ०४
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची बॅचलर इन रेडिओलॉजी(बी.एम.आर.टी) पदवी आवश्यक. ०२) शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये रेडिओलॉजी विभागात तंत्रज्ञ म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभवास प्रधान्य. ०३) महाराष्ट्र राज्य उच्चव तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण. ४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

४) ई.सी.जी. तंत्रज्ञ / E.C.G. Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र विषयांसह विज्ञान शाखेची पदवी आवश्यक. ०१) शासनमान्यता संस्थेतून हदयस्पंद आलेख तंत्रज्ञ या विषयांचे प्रशिक्षण पुर्ण. ०३) शासकीय निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये ई.सी.जी.टेक्निशियन म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभवास प्रधान्य.

५) क्ष-किरण तंत्रज्ञ / X-Ray Technician ०६
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची बॅचलर इन रेडिओलॉजी(बी.एम.आर.टी) पदवी आवश्यक. ०२) शासकीय निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभवास प्रधान्य. ०३) महाराष्ट्र राज्य उच्चव तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही परीक्षा उतीर्ण. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

इतका मिळणार पगार

अटेंडंट (Attendant) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

E.C.G. तंत्रज्ञ (E.C.G. Technician) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता : राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.

मुलाखतीची तारीख – 14 जून 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा