जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । सन २०१३ नंतर शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या टीईटी पात्रता परीक्षेत घोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सेवेत असलेल्या प्राथमिक व माध्यमिकच्या ३९३ शिक्षकांचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाने पडताळणीसाठी पुणे परीक्षा परिषदेकडे पाठवले आहे.
आता या शिक्षकांच्या भवितव्याचा निर्णय पुणे परीक्षा परिषदेच्या पडताळणीवर अवलंबून आहे. शिक्षकांची नियुक्ती करताना टीईटी उत्तीर्णचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात टीईटीची बोगस उत्तीर्णतेची प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे टीईटी परीक्षांचा फेरआढावा घेण्याचे शासनाने ठरवले आहे. २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या प्राथमिकच्या २३७ व माध्यमिकच्या १५६ असे ३९३ शिक्षकांचे प्रमाणपत्र हे त्याच काळातील आहे.
त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र मागवले होते. शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा झालेली प्रमाणपत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवली आहे. शिक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, टीईटी परीक्षेचा बैठक क्रमांक याचा उल्लेख आहे.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..