⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | गुन्हे | Jalgaon : अवैधपणे गॅस भरताना सिलेंडरचा भीषण स्फोट,ओमानी जाळून खाक; दहा जण भाजले

Jalgaon : अवैधपणे गॅस भरताना सिलेंडरचा भीषण स्फोट,ओमानी जाळून खाक; दहा जण भाजले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे वाढलेले दिसत असून अशातच ओमनी गाडीमध्ये अवैधपणे गॅस भरत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना शहरातील इच्छा चौफुली जवळ घडली. या घटनेत तीन महिलांसह दहा जण भाजले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅनचालकासह गॅस भरणारा आणि शेजारचा व्यावसायिक हे देखील जखमी झाले आहेत.

याबाबत असे की, पुणे येथे राहणारे संजय गणेश दालवाला (वय ४५) हे पत्नी प्रतिभा व मुलगी रश्मी यांच्यासह जळगावातील गौरव हॉटेलजवळ राहणारे साडू भरत संजय दालवाला यांच्याकडे मंगळवारी सकाळी आले होते. भरत दालवाला यांच्या कुटुंबासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात धार्मिक विधी करण्याचे नियोजन त्यांनी केले.

त्यासाठी वाघनगरातील संदीप शेजवळ यांची ओमनी व्हॅन (एमएच १५ बीएक्स २८१२) भाडे तत्वावर ठरवली. भरत दालवाला यांच्या घरून अमळनेर येथे जायला निघाल्यावर कारचालकाने मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी पोलिस चौकीपासून १०० मीटर अंतरावर असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर त्याने गॅस भरण्यासाठी कार थांबवली. तिथे टाकीमध्ये गॅस भरताना टाकी फुटून मोठा स्फोट झाला.

या स्फोटात ओमिनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा जण जखमी झाले असून घटनेत भाजलेल्या गंभीर चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

धक्कादायक म्हणजेच पोलिस चौकीपासून १०० मीटरच्या आत अंतरावर अवैध गॅसचा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांच्या दररोजच्या येण्याजाण्याच्या मार्गावर अवैध धंदा सुरू असून देखील त्याकडे दुर्लक्ष का केले गेले ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.