तापमानाने केळी पिकाचे नुकसान, भरपाई मिळणार, जिल्ह्यातील या गावांचा समावेश

मे 18, 2022 12:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । यंदाचा उन्हाळा हा चांगलाच त्रासदायक ठरतोय. वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. अशातच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहारमधील केळी पिकाचे १ ते १५ मे या कालावधीमध्ये सलग पाच दिवस तापमान ४५ अंश व त्यापेक्षा जास्त तापमानामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना ४६,५०० प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होईल. तसेच यापूर्वी कमी तापमानाने झालेल्या नुकसानीची भरपाई २६,५०० अशी एकूण ७० हजारांची प्रती हेक्टरी मंजूर होतील, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आली.

banana tree

१ मे ते १५ मे २०२२ दरम्यान जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

रावेर लोकसभा क्षेत्र

१. जामनेर : जामनेर, नेरी बू., पहूर, शेंदुर्णी.
२. बोदवड : बोदवड, नाडगाव.
३. चोपडा : अडावद, चाहार्डी, चोपडा, धानोरा प्र., गोरगावले
४. मुक्ताईनगर : मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे
५. रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
६. यावल : बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बू., सकाळी, यावल.
७. भुसावळ : वरणगाव, कु-हे, पिंपळगाव खु., भुसावळ

जळगांव लोकसभा क्षेत्र

१. जळगाव : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद.
२. अमळनेर : अमळगाव, अमळनेर,भरवस, मारवड, नगाव, पतोंडा, शिरुड, वावडे.
३. भडगाव : भडगाव, कोळगाव.
४. चाळीसगाव : मेहूनबारे
५. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी,पिंपरी, साळवा, सोनवद.
६. एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगनगांव, उत्रान,
७. पाचोरा : गाळण बू., कुराड बू., नांद्रा.
८. पारोळा : बहादरपुर, चोरवड, शेळावे, तामसवाडी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now