जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । एरंडोल तालुक्यातील चंदनबर्डी जिल्हा परिषद शाळेला एरंडोलच्या तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी ३० एप्रिल रोजी टीव्ही संच भेट म्हणून दिला. चंदनबर्डी या आदिवासीबहुल विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद शाळेला स्वखर्चातून त्यांनी ३२ इंची टीव्ही भेट दिला.
या शाळेतील शिक्षकांची शाळेप्रती असलेली भावना, प्रेम, सेवाभाव व विद्यार्थ्यांची स्वखर्चातून करीत असलेली सेवा बघून तहसीलदारांनी स्वखर्चातून टीव्ही दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गुलाबसिंग पाटील होते. शिक्षक लक्ष्मण कोळी, अंगणवाडी सेविका मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लक्ष्मण कोळी यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांसह मंळल अधिकारी शिंपी, उपसरपंच नितीन जगताप, सदस्य प्रवीण पाटील, रवींद्र जाधव, धनसिंग पाटील, शांताराम शिंदे, विमल मोरे, विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ईश्वर पाटील, शालेय समिती अध्यक्ष रवींद्र पाटील, महेंद्र पवार, पोलिस पाटील भगवान पाटील, पंडित पाटील, साहेबराव पाटील, एकनाथ पाटील, चंदू पाटील, सुनील जगताप, बाला जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रदर्शन जे.के. पाटील यांनी मानले.