⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

तहसीलदार,नायब तहसीलदार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव लाईव्ह न्युज।1एप्रिल। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या प्रलंबित सेवाविषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सेवाविषयक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांच्या पार पडलेल्या बैठकीत प्रलंबित बाबींचे निषेधार्थ आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

यात दिनांक 30 मार्च रोजी जिल्हाधिकारी व आयुक्त यांना निवेदन देणे तर दिनांक १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्याफिती लावून धरणे आंदोलन करणे तसेच दिनांक 18 एप्रिल रोजी सर्व सदस्य पदाधिकारी रजा टाकून विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील तर या कालावधीतही उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास ४ मेपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनावर कार्याध्यक्ष सुरेश बगडे यांची सही आहे.