राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्युज | ५ सप्टेंबर २०२१ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अण्णासाहेब डॉ के बी पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील, रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, कल्पना पाटील, अभिषेक पाटील ,कुणाल पवार , स्वप्निल नेमाडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतामध्ये माजी कुलगुरू आ के. बी. पाटील यांनी शिक्षकांनी आपले कार्य जबाबदारी करावे.ऑनलाईन शिक्षणाला कर सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले. व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक आघाडी कार्यकारणीतील सदस्य हेमंत सोनार महानगर अध्यक्ष, प्रवीण धनगर महानगर सचिव, मनोज भालेराव महानगर कार्याध्यक्ष, सागर पाटील महानगर सरचिटणीस, पंकज सूर्यवंशी महानगर सहसरचिटणीस, विजय विसपुते महानगर उपाध्यक्ष, पवार महानगर सहसचिव यांनी परिश्रम घेतले.