---Advertisement---
गुन्हे चोपडा

भरधाव दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

---Advertisement---

ळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । रस्त्याने पायी फिरायला गेलेल्या शिक्षकाला मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, उपचार सुरु असतांना रविवारी पहाटे या शिक्षकांचा मृत्यू झाला. राजेंद्र रामचंद्र वाघ (वय ४८) असे मृत शिक्षकाचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

rajendra wagh jpg webp

याबाबत असे की, चोपडा शहरातील शिव कॉलनीमधील रहिवासी व बिडगाव येथील ओं. गो. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र रामचंद्र वाघ (वय ४८) हे पत्नीसह ५ रोजी सायंकाळी जुना हरेश्वर रस्त्याने पायी फिरायला गेले हाेते. संस्कार मंडपम या मंगल कार्यालयाजवळून घराकडे परत येत असताना अरुंद पुलाजवळ त्यांना चोपड्याकडे येणाऱ्या एका अज्ञात शाईन कंपनीच्या दुचाकी चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली.

---Advertisement---

या अपघातात त्यांच्या हाताला मार लागला व ते डोक्यावर पडले. त्यानंतर त्यांना तत्काळ उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्त्राव जास्त झाल्याने व गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले हाेते. मात्र, उपचारादरम्यान ६ रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या २६ वर्षापासून ते इंग्लिश विषयाचे अध्यापन करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ४ भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, मोठ्या आवाजाने हॉर्न वाजून भरधाव वेगात वाहने पळवणाऱ्यांची संख्या चोपड्यात वाढलेली आहे. पोलिसांनी अशा दुचाकी पळवणाऱ्या मुलांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---