⁠ 
बुधवार, मे 8, 2024

शिक्षक एक अन् जबाबदाऱ्या अनेक.. ग्रामस्थ आक्रमक, म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील दगडी व मनवेल येथील जि.प.प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, तर पथराडे व शिरागड येथे प्रत्येकी एक जागा रिक्त असल्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, पालक आक्रमक झाले असून येत्या आठ दिवसांत शिक्षक नियुक्त करा. अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

दगडी येथे ७०० लोकसंख्येच्या आदिवासी गावात अजून शिक्षकांची गरज आहे. मनवेल आणि दगडी अशी दोन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत दगडी गावाचे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. भिल्ल आणि कोळी समाजाची वस्ती असलेल्या दगडी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. १९९० मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत आजच्या स्थितीत पहिली ते चौथीपर्यंत होत आहे.

मनवेल व दगडी येथील शिक्षकांची जिल्हा बदली झाली आहे. दगडी येथे रिक्त जागी गट साधन केंद्रामधील विषयतज्ञ शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे, तर मनवेल येथे एक जागा रिक्त आहे. एका शिक्षकावर ६८ विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे, शासनाने मागविलेली ऑनलाईन माहिती देणे, कोरोनाचे लसीकरण सर्वेक्षण करणे यासह विविध माहिती पुरविणे व शाळा सुरळीत सुरु ठेवणे, एका शिक्षकावर मोठी जबाबदारी येते. यामुळे येथे अजून दोन शिक्षक तत्काळ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे. याची आठवडाभरात दखल न घेतल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ११५ शिक्षकांची जिल्हा बदली आहे. त्यांनी आपल्या चार्ज सोडून त्यांच्या जिल्ह्यात रुजू झाले. मात्र इतर जिल्ह्यातील शिक्षक हजर झाले आहे. मात्र त्यांना रिक्त जागांवर हजर करण्यात आले नसल्यामुळे शिक्षकाच्या जागा रिक्त आहे. दगडी जि.प. शाळेत ६८ विद्यार्थ्यांचा पट आहे. पहिली ते चौथीपर्यंत चार वर्गांना तीन शिक्षकांची गरज असून, एकच शिक्षक असल्याने दोन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.