⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | वाणिज्य | TATA बहुप्रतिक्षित CNG कार लाँच ; जबरदस्त मायलेज अन् किंमत फक्त

TATA बहुप्रतिक्षित CNG कार लाँच ; जबरदस्त मायलेज अन् किंमत फक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Tata Motors ने बहुप्रतिक्षित SUV पंच CNG विक्रीसाठी 4 ऑगस्ट रोजी लाँच केली आहे. ही SUV एकूण 5 प्रकारांमध्ये लॉन्च केली गेली आहे. ज्याची किंमत 7.10 लाख ते 9.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ऑफर केली गेली आहे.

विशेष म्हणजे, ही किंमत SUV च्या जवळच्या प्रतिस्पर्धी Hyundai Exter च्या CNG प्रकारापेक्षा खूपच कमी आहे. ज्याची किंमत रु. 8.24 लाख आहे. पंच सीएनजी तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, टाटा Tiago, Tigor आणि Altroz ​​नंतर टाटाने सादर केलेले हे चौथे CNG मॉडेल आहे.

एनजी व्हेरियंट प्रत्येक पेट्रोल ट्रिमच्या तुलनेत सुमारे 1.60 लाख रुपयांनी महाग आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे. पंच सीएनजी कंपनीने गेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान प्रथम प्रदर्शित केली होती, ती त्याच्या विभागातील सर्वात सुरक्षित SUV कार आहे, तिला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे

टाटा पंच सीएनजी पॉवर आणि परफॉर्मन्स:
पंच CNG मध्ये, कंपनीने तेच 1.2-लिटर, तीन-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे पेट्रोल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन पेट्रोलसह 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क आणि CNG मोडमध्ये 73.4hp पॉवर आणि 103Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि ते फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह दिले जाते. म्हणजेच सीएनजी ग्राहकांना ऑटोमॅटिकचा लाभ मिळणार नाही.

टाटा मोटर्सच्या CNG लाईन-अपमधील इतर मॉडेल्सप्रमाणे, PUNCH देखील CNG मोडमध्ये थेट सुरू केले जाऊ शकते, हे वैशिष्ट्य मारुती किंवा Hyundai द्वारे ऑफर केलेल्या CNG कारमध्ये उपलब्ध नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.