⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

तलाठी भरती परीक्षेबाबत महत्वाची बातमी; ऐन वेळी वेळापत्रकात बदल

जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। तलाठी भरती परिक्षेआधी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परिक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. तलाठी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर ताटकळत थांबावं लागलं. आता या परिक्षेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावले आहेत.

तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय आहे. मागचे कित्येक दिवस विद्यार्थ्यांनी या तलाठी भरती परिक्षेची तयारी केली. आपण मेहनत केल्यास आपल्या यश पदरी पडेल, असं या विद्यार्थ्यांना वाटत होतं. कालपर्यंत या परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज परिक्षा केंद्रावर पोहोचले. कारण आज सकाळी नऊ वाजता पेपर होणार होता. पण परिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थ्यांच्या पदरी पडली ती निराशा… कारण सर्व्हर डाऊन असल्याने परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता.

संपूर्ण राज्यामध्ये विविध परीक्षा केंद्रावर ही आज तलाठी भरतीची परीक्षा होतेय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती होती. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती होती.

अमरावतीत तलाठी पदाची परीक्षा अखेर सुरू झाली आहे. सकाळपासून सर्वर डाऊन असल्याने वेळेवर परीक्षा सुरू न झाल्याने केंद्रावर गोंधळ होता. राज्यभरातून परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थी अमरावतीत आले आहे. सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र, सर्वर डाऊन मुळे विद्यार्थ्यांना 10 वाजता परिक्षा केंद्रात सोडण्यात आले.. 10.30 वाजता परीक्षा सुरू झाली. यानंतर आज दुपारी 12.30 वाजता एक पेपर होणार होता. मात्र पण पहिला पेपर उशीर झाल्याने दुपारचं वेळापत्रक कोलमडलं आहे. या पेपरच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे.