---Advertisement---
चोपडा गुन्हे

वाळूमाफियांनी केला गेम, दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांंना तलाठी रंगेहाथ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । वाळूमाफिया, वाळू व्यावसायिकांकडून लाच मागणे आजवर अनेकांना महागात पडले आहे. तापी नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याच्या मोबादल्यात १० हजाराची लाच स्विकारणाऱ्या देवगावच्या तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

talathi caught while accepting a bribe of ten thousand rupees

चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरने तापी नदीमधून वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे देवगाव येथील तलाठी भुषण विलास पाटील (वय-३२) रा. पंकज नगर चोपडा याने दर महिन्याला १० हजाराची मागणी केली होती. आज चोपडा तहसील आवारात असतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला त्यानुसार तक्रारदार यांनी मागणीनुसार पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे चोपडा तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---