Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अखेर दयाबेन मालिकेत परतणार? विश्वास बसत नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा!
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । मागील गेल्या १४ वर्षांपासून लोकांच्या मनात राज्य करणारी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजकाल अनेक बदलांमधून जात आहे. या शोमध्ये एकीकडे कलाकार शो सोडत आहेत तर दुसरीकडे प्रेक्षकांची आवड टिकवण्यासाठी निर्माते प्रसिद्ध पात्राला परत आणत आहेत. दरम्यान, अशातच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मालिकेत ‘दया बेन’ची (Daya Ben) वापसी होणार आहे.
तारक मेहता का उल्टा चष्माचा नवा प्रोमो पाहून तरी असे म्हणता येईल. शोमध्ये ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण नुकताच आला आहे. आता दयाबेनची पावले पुन्हा गोकुळधाममध्ये पडणार असून गरबा क्वीन परतणार आहे. दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी मालिकेतून अनेक वर्ष गायब आहे. लग्न आणि संसारात लक्ष देण्यासाठी दिशाने काही काळ मालिकेतून ब्रेक घेत आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं होतं. त्यानंतर दिशांच्या येण्याबद्दल अनेकदा चर्चा झाली, त्यावर अनेक प्रश्नउत्तर झाली मात्र दिशांची मालिकेत येण्याबद्दल काही चिन्ह दिसत नव्हती.
त्यामुळे मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांना एकच प्रश्न सतावत आहे तो म्हणजे दयाबेनची एंट्री मालिकेत कधी होणार? या मालिकेत दयाबेन कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता अशातच दयाबेन अर्थात अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत पुन्हा परतणार असलयाचे बोलले जात आहे.
दयाबेन अखेर मालिकेत परत येणार असून त्या संदर्भात दाखवला जाणारा नवा प्रोमो प्रचंड पसंत केला जात आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल सुंदरलालशी फोनवर बोलत आहेत ज्यामध्ये सुंदरलाल त्याला दयाबेन मुंबईला येत असल्याची माहिती देतो आणि तो स्वतः तिला घेऊन येणार आहे. मग गोकुळधामच्या गेटवर कोणाची तरी सावली दिसते आणि मग गुजराती साडीतली बाई दिसते. ज्यावरून हे स्पष्ट होत आहे की आता दयाबेन शोमध्ये पुनरागमन करत आहे, ज्यामुळे सर्वजण आनंदी आहेत.
दिशा वाकाणीची बदली झाली का?
आता प्रश्न असा आहे की, या शोमधील दयाबेनची भूमिका आता दिशा वाकानी नाही तर दुसरी कोणी करणार आहे का? कारण दिशा वाकानी नुकतीच आई झाली आहे, त्यामुळे ती इतक्या लवकर शोमध्ये परतणार नाही, म्हणजे दिशा वाकाणीची जागा घेतली जात आहे.