जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेला भव्य जलतरण तलाव गेल्या काही वर्षापासून बंद होता. त्यात दोन वर्षापासून कोविड असल्याने तो कार्यान्वितच झालेला नव्हता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून नवीन कंत्राटदारामार्फत गुरुवारी पुन्हा नव्याने जळगावकरांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आला आहे.
जलतरण तलावाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सागर सपके, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, राहुल सूर्यवंशी, चेतन महाले, यादव महाले, ललित सूर्यवंशी, बाळा सोनवणे यांची उपस्थिती होती. जलतरण वर्गासाठी ५ ते १८ वयोगटासाठी ९०० रुपये महिना तर १८ वर्षावरील महिला,पुरुषांसाठी १२०० रुपये महिना ठेवण्यात आलेला आहे. नागरिकांना सकाळी ६ ते १० व संध्याकाळी ४ ते ५ व ६ ते ८ अशा वेळेस जलतरण याचा आनंद घेता येणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षण देखील मिळणार आहे. तसेच राज्य,राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंसाठी फी मध्ये सवलत देखील देण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी यांनी यावेळी सांगितले.