विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१। सातवा वेतन आयोगासह इतर विविध मागण्यांसाठी आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता क्रांती दिनानिमित्त महापालिकेसमोर अखिल भारतीय मनपा सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय कामबंद आंदोलन राबवण्यात आले. या आंदोलनातील शहीद भगतसिंग महानगरपालिका कर्मचारी संघटनेने पाठींबा दिला , मागण्यांचे निवेदन आयुक्त सतिष कुळकर्णी यांना देण्यात आले.
महानगरपालिका कर्मचारी संघटने तर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे आज विविध मागण्यांसाठी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. यात विनाअटी शर्ती सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, गेल्या सहा वर्षांपासून बंद केलेली पेन्शन विक्री योजना पुन्हा सुरू करावी व नव्याने प्रस्तावानुसार नोकर भरती सुरु करा, सन २००५ नंतर बंद केलेली पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करा . अस्थाना कडील विशेष लेखापरिक्षण अहवालानुसार कर्मचारी व अधिकारी वगळता इतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती लागू करा यासह विविध मागण्या करण्यात आल्यात.
जळगाव महानगर पालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनाचाही या कामबंद आंदोलनात सहभाग होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अनिल नाटेकर, गुरुनाथ सैंदाणे, प्रफुल्ल पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.व हे आंदोलन पारपडलेच.