जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । दीक्षीतवाडी येथे ज्यसिंची गाडी लावण्यावरून एकाला शिविगाळ करून दमदाटी करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय घनशाम शर्मा (50, दीक्षीतवाडी) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या घरसमोर सैय्यद आसीफ सैय्यद शाहीद हा ज्यूस गाडी लावतो. गुरूवार, 7 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजय घनश्याम शर्मा यांनी घरसमोर गाडी लावून नको, असे सैय्यद आसीफ याला सांगितले. याचा राग आल्याने सैय्यद आसीफ याने शिवीगाळ करून दमदाटी केली आणि तुझ्याकडून जे होईल ते करून घे असा दम दिला. याप्रकरणी संजय शर्मा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सैय्यद आसीफ सैय्यद शाहीद (दीक्षीतवाडी) याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.