जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून या राजकीय रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ मधून एक तरुण, तडफदार आणि विकासाची दूरदृष्टी ठेवणारे नेतृत्व म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल अशोक परदेशी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. कोणावरही टीका न करता केवळ ‘विकास’ आणि ‘जनसेवा’ या ध्येयाने त्यांनी प्रचाराचा नारळ फोडण्याचा संकल्प केला आहे.

समाजकार्याचा वसा आणि जनसेवेचा ध्यास
स्वप्निल परदेशी हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नसून, समाजकारणातही त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी अनेकदा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सकारात्मक राजकारणाची नवी दिशा
राजकारणात सहसा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, परंतु स्वप्निल परदेशी यांनी मात्र अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. “कोणालाही विरोध करण्यासाठी नाही, तर प्रभागाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी निवडणूक लढवणार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या पॉझिटिव्ह अप्रोचमुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले आहे.

प्रभाग १२ साठी ‘व्हिजन’ तयार
स्वप्निल परदेशी यांच्याकडे प्रभागाच्या विकासाचे पक्के मॉडेल तयार आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत गोष्टींसह प्रभागाला एक ‘मॉडेल वॉर्ड’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या पाठीशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि कामाचा तडाखा पाहता, प्रभाग क्रमांक १२ मध्ये परिवर्तनाचे वारे नक्कीच वाहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
स्वप्निल परदेशी यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे प्रभाग क्रमांक १२ मधील शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. “आमचा नेता, आमचा विकास” अशा भावना व्यक्त करत नागरिक आतापासूनच त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येणारा काळच ठरवेल की विजयाचा गुलाल कोणाच्या माथी लागेल, पण स्वप्निल परदेशी यांच्या दमदार एन्ट्रीने निवडणुकीत एक वेगळीच रंगत आणली आहे, हे मात्र नक्की!









