---Advertisement---
रावेर निधन वार्ता

सावद्यातील स्वामी वासुदेव चरणदास यांचे वडताल येथे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । सावदा येथील वडताल संस्थांच्या श्री स्वामीनारायण मंदिराचे माजी कोठारी स्वामी वासुदेव चरणदास यांचे २५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता आजारामुळे वडताल, गुजरात येथे निधन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे समस्त स्वामी नारायण सत्संग समाज व सर्व खान्देश सत्संग समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

swami vasudev charandas jpg webp

वासुदेव चरणदास यांचे बालपण चिखली (ता. यावल) येथे गेले आहे. खान्देश विभागातील विद्वान शास्त्री स्वामी कृष्णस्वरूपदास यांचे ते शिष्य होते. पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांनी स्वामीनारायण संप्रदायात प्रवेश केला. तेव्हापासून ते संन्यस्त जीवन जगू लागले. त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. यावल येथे श्री स्वामीनारायणाचे भव्य मंदिर निर्माण कार्य त्यांनी पूर्ण केले. त्यांच्यावर आज शनिवारी सकाळी १० वाजता वडताल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---