---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रांनीच केला खून, कुटुंबियांचा आरोप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या गोरख अशोक कोळी (वय-२२) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. दरम्यान, गोरखचे काही मित्र त्याच्याकडे काही दिवसापासून दारू पिण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करीत होते. पैसे न दिल्याने मित्रांनीच खून केल्याचा आरोप गोरखच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

suicide gorkh

हरिविठ्ठल नगरात गोरख कोळी हा तरुण आई आणि लहान भावासह वास्तव्याला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गोरख नेहमी मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता. सोमवारी घरी कुणीही नसतांना गोरखने घरात दुपारी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना कळविले. गोरख कोळी यांचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात.

---Advertisement---

दरम्यान, गोरखने आत्महत्या केली नसून त्याला गळफास देण्यात आला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू कोळी आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिघे मित्रांनी संगनमताने त्याला गळफास दिला असल्याचा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला आहे. घटनास्थळी गोरखचा मृतदेह संशयास्पद स्थितीत गळफास घेतला असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.को. ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत .

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---