जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । शिरसोलीच्या राजपाल नगरात वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय महिलेचा गळफास घेतल्याने संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आलीय. दरम्यान, घातपातची शक्यता असल्याने महिलेच्या पतीला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नबाबाई भाऊलाल भिल (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पती भाऊलाल पांडूरंग भिल (वय ४२) व सहा मुलांसह शिरसोली येथे वास्तव्यास आहे. भिल दाम्पत्य हे रविवारी १९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावात गेले. फळ, भाजीपाला व चिकन असे वस्तू विकत घेवून सायंकाळी घरी येत असताना भाऊलाल भिल याने गावठी दारू पिली आणि सोबत अजून काही दारू सोबत घेतली. सायंकाळी ६.३० वाजता घरी आले. त्यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. भाऊलाल भिल यांची आई शिरसोली पासून २ किलोमीटर असलेल्या धरणाच्या ठिकाणी भिल वस्तीत राहते. त्याठिकाणी सर्व मुले आजीकडे गेली होती. त्यामुळे पती व पत्नी हे दोघेच घरी होते.
भाऊलालने दारू प्यायला असल्याने तो घराबाहेर खाटेवर झोपला होता. सोमवारी २० जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो झोपेतून उठाला असता त्याला त्याची पत्नी किचन रूममध्ये निपचित पडलेली दिसली. त्याने शेजारी राहणाऱ्या मंगलाबाई ठाकरे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या काही मिनीटात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे पोलीसांना अजून समजलेले नाही. याबाबत पती भाऊलाल भिल याचा विचारणा केली असता दारू पिलेला असल्याने रात्री काय झाले मला सांगता येत नाही. असे सांगितले.
घटनास्थळी पोलीस पथक रवाना
सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळ दाखल झाले. घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पीएसआय दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ रतीलाल पवार, सचिन मुडे ,जितेंद्र राठोड, शुध्दोसन ढवळे यांनी माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.
संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका
महिलेच्या गळ्यावर काही व्रण दिसून आल्याने तिने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहिती समोर आली. परंतू तिचा मृतदेह किचन रूममध्ये निपचित पडलेला आढळून आल्याने तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घराच्या बाहेर हातातील बांगड्या व आरसा फुटलेला दिसून आल्याने पोलीसांनी सर्व संशयास्पद वस्तू जप्त केले आहे. याबाबत पती भाऊलाल भिल याचा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस पाटील श्रीक्रृष्ण बारी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.